डोंबिवलीत फेरीवाल्यांकडून वृध्द हॉटेल मालक, कर्मचाऱ्यांना बेदम मारहाणमारहाण सुरू असताना बाजुचे दोन व्यापारी मध्यस्थी करण्यासाठी पुढे आले तर फेरीवाल्यांनी त्यांनाही मारहाण केली आहे.

डोंबिवलीत फेरीवाल्यांकडून वृध्द हॉटेल मालक, कर्मचाऱ्यांना बेदम मारहाण

मारहाण सुरू असताना बाजुचे दोन व्यापारी मध्यस्थी करण्यासाठी पुढे आले तर फेरीवाल्यांनी त्यांनाही मारहाण केली आहे.

डोंबिवली: डोंबिवली येथील पूर्व भागातील उर्सेकरवाडी मधील एका हॉटेलच्या वृध्द मालकाला, या हॉटेलमधील वृध्द कामगार आणि सेवकाला तीन फेरीवाल्यांनी हॉटेलमध्ये घुसून बुधवारी संध्याकाळी बेदम मारहाण केली. मारहाण सुरू असताना बाजुचे दोन व्यापारी मध्यस्थी करण्यासाठी पुढे आले तर फेरीवाल्यांनी त्यांनाही मारहाण केली आहे. मारहाण सुरू असताना हॉटेल मालकाचा मुलगा चिंतन देढिया यांनी रामनगर पोलीस ठाण्यात संपर्क करुन तात्काळ पोलीस हॉटेलमध्ये पाठविण्यास सांगितले. हाकेच्या अंतरावर असलेल्या हॉटेलमध्ये पोलीस शेवटपर्यंत आले नाहीत, अशी तक्रार चिंतन देढीया यांनी केली आहे.

मिळालेली माहिती अशी, महेश देढिया (६३) यांचे डोंबिवली पूर्व रेल्वे स्थानक भागातील पूजा-मधुबन सिनेमा गृहांच्या बाजुला ड्रिम लॅन्ड हॉटेल आहे. हॉटेलमध्ये ग्राहक सेवक, स्वयंपाक गृहात ६० वर्षाची मावशी काम करतात. बुधवारी संध्याकाळी साडे चार वाजता उर्सेकरवाडी भागातील एक फेरीवाला ड्रिम लॅन्ड हॉटेलमध्ये जाऊन वडापावची मागणी करू लागला. वडापाव संपले आहेत. दुसरे जिन्नस तयार आहेत, असे सेवकाने फेरीवाल्याला सांगताच फेरीवाल्याने सेवकाशी हुज्जत घालून त्याला मारहाण सुरू केली. त्याच्या मदतीला इतर दोन फेरीवाले हॉटेलमध्ये आले

Comments